esakal | 'रिलायन्स' बनली सर्वात मोठी ऑक्सिजन उत्पादक कंपनी; मुकेश अंबानी स्वतः घालताहेत लक्ष

बोलून बातमी शोधा

Reliance Industries seeks extending Mukesh Ambani's term

'रिलायन्स' बनली सर्वात मोठी ऑक्सिजन उत्पादक कंपनी; मुकेश अंबानी स्वतः घालताहेत लक्ष

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात ऑक्सिजनी मोठी समस्या निर्माण केली आहे. ऑक्सिजनची ही समस्या दूर करण्यासाठी टाटा, अदानी यांच्यानंतर रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमेटेडने (RIL) युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. रिलायन्सने आपल्या जामनगर रिफायनरीत ऑक्सिजनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. या प्लान्टमधून विविध राज्यांना लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा (LMG) पुरवठा वाढवला आहे. रिलायन्सच्या या प्लान्टमध्ये दररोज १००० मेट्रिक टनपेक्षा अधिक मेडिकल ग्रेड ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. RILचे चेअरमन मुकेश अंबानी स्वतः ऑक्सिजनच्या उत्पादन कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

RILने जामनगर रिफायनरीच्या माध्यमातून ऑक्सिजनचा उत्पादन १००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवलं आहे. हा दर दिवसाचा १००० मिट्रिक टन ऑक्सिजन साठा १ लाखांहून अधिक लोकांची ऑक्सिजनची गरज भागवू शकते. इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन उत्पादित करणारी रिलायन्स ही भारतातील पहिलीच मोठी कंपनी ठरली आहे. भारतातील एकूण ऑक्सिजनपैकी रिलायन्स एकटी ११ टक्के ऑक्सिजन उत्पादित करत आहे. तसेच प्रत्येक दहापैकी एका व्यक्तीला ऑक्सिजन पुरवत आहे. गेल्या काही दिवसांपासून RIL कडून दर दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनच उत्पादन घेतलं जात होतं.

जामनगर रिफायनरीत ऑक्सिजनचं उत्पादन

रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीत कच्च्या तेलापासून डीझेल, पेट्रोल आणि जेट इंधन तयार होतं. या ठिकाणी यापूर्वी मोडिकल ग्रेड ऑक्सिजनचं उत्पादन केलं जात नव्हतं. मात्र, देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रिलायन्सने आपल्या प्रक्रियेत बदल करुन मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादनं सुरु केलं. कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून रिलायन्सने आत्तापर्यंत ५५,००० मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचा मोफत पुरवठा केला आहे.

२४ टँकर्स केले एअरलिफ्ट

देशात ऑक्सिजसाठी वाहतुकीची समस्या दूर करण्याासाठी रिलायन्सने २४ टँकर्स परदेशातून एअरलिफ्ट केले होते. यामध्ये जर्मनी, नेदरलँड, बेल्जिअम, सौदी अरेबिया आणि थायलंड या देशांचा समावेश आहे.