भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचा मोठा वाटा : मुकेश अंबानी 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम सुरु आहे. अर्थव्यवस्थेला आलेली तात्पुरती आलेली मरगळ आहे. भारताला पुढे घेऊन जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. रिलायन्स आता स्वतःला न्यू रिलायन्स म्हणून सादर करेल. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन होण्याची शक्यता आहे.

मुंबई : रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. या बैठकीत कंपनीकडून काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवा, जिओफोन 3 आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत घोषणा केली जाईल असा अंदाज आहे.

अंबानी म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम सुरु आहे. अर्थव्यवस्थेला आलेली तात्पुरती आलेली मरगळ आहे. भारताला पुढे घेऊन जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. रिलायन्स आता स्वतःला न्यू रिलायन्स म्हणून सादर करेल. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन होण्याची शक्यता आहे. जिओने 32 टक्के मार्केटमध्ये वर्चस्व घेतले. रिलायन्स सर्वाधिक जीएसटी भरणारा उद्योग समूह झाला आहे. तसेच सर्वाधिक आयकर भरणारा समूहही आहे. रिलायन्स समूह निर्यात करणारा देशातील सर्वांत मोठा समूह बनला आहे. तब्बल 107 देशांमध्ये निर्यात केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance has become Indias largest exporter exporting to 107 countries said CMD Mukesh Ambani