Reliance Jio: BSNLला मागे टाकत रिलायन्स जिओ टॉप! बनली सर्वात मोठी वायरलाइन कंपनी

Reliance Jio
Reliance JioSakal

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओ 7.3 दशलक्ष (70.3 लाख) ग्राहकांसह सर्वात मोठी वायरलाइन सेवा प्रदाता बनली आहे. 7.1 दशलक्ष (70.1 लाख) ग्राहक असलेल्या सरकारी बीएसएनएलला जिओने मागे टाकले आहे. TRAI ने मंगळवारी ऑगस्ट 2022 रोजी संपलेल्या महिन्याचा मासिक ग्राहक डेटा जारी केला.

ट्रायच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने ऑगस्टमध्ये 32.8 लाख नवीन ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने 3.2 लाख ग्राहक जोडले, तर व्होडाफोन आयडियाने 19.6 लाख ग्राहक गमावले. 32.8 लाख मोबाईलच्या नव्या कनेक्शनसह, जिओच्या ग्राहकांची संख्या 419.24 दशलक्ष झाली आहे. 363.8 दशलक्ष ग्राहकांसह एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जिओच टॉपर

ताज्या आकडेवारीनुसार, जिओने मोबाइल ग्राहक बेस, वायरलाइन ब्रॉडबँड आणि वायरलाइन या तिन्ही श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. TRAI जारी केलेल्या डेटानुसार, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​6.56 मिलीयन, भारती एअरटेल 5.13 मिलीयन आणि बीएसएनएल 3.88 मिलीयन टॉप तीन वायर्ड ब्रॉडबँड सेवा प्रदात्यांपैकी आहेत. भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या जुलै-22 च्या अखेरीस 1,173.66 दशलक्ष वरून ऑगस्ट 2022 अखेर 1,175.08 दशलक्ष झाली आहे, मासिक वाढ 0.12 टक्के आहे.

Reliance Jio
Oppo ने भारतात कमी केल्या तीन स्मार्टफोन्सच्या किमती, येथे जाणून घ्या डिटेल्स

एकूण शहरी टेलिफोन सबस्क्रिप्शनमध्ये वाढ

आकडेवारीनुसार, शहरी टेलिफोन सबस्क्रिप्शन जुलै-22 अखेर 650.40 मिलीयनवरून 22 ऑगस्ट-22 अखेर 651.07 मिलीय पर्यंत वाढले आणि ग्रामीण सबस्क्रिप्शन 524.01 मिलीयन वरून 524.01 मिलीयनपर्यंत वाढले. याच कालावधी TRAI ने सांगितले की ऑगस्ट 2022 मध्ये शहरी आणि ग्रामीण टेलिफोन सबस्क्रिप्शनचा मासिक वाढीचा दर अनुक्रमे 0.10 टक्के आणि 0.14 टक्के होता. भारतातील एकूण टेलि-डेन्सिटी जुलै 2022 अखेर 85.11 टक्क्यांवरून ऑगस्ट 2022 अखेर 85.15 टक्क्यांपर्यंत वाढली. शहरी टेली-घनता जुलै 2022 अखेर 134.78 टक्क्यांवरून 134.71 टक्क्यांवर घसरली. तथापि, ऑगस्ट 2022 अखेर याच कालावधीत ग्रामीण दूरध्वनी घनता 58.37 टक्क्यांवरून 58.44 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Reliance Jio
Amazon Sale: दिवाळीच्या मुहूर्तावर 5G फोन खरेदीचा विचार करताय? मिळतेय बंपर ऑफर

ऑगस्ट 2022 अखेरीस एकूण टेलिफोन ग्राहकांमध्ये शहरी आणि ग्रामीण ग्राहकांचा वाटा अनुक्रमे 55.41 टक्के आणि 44.59 टक्के होता. वायरलाइन ग्राहकांची संख्या जुलै-22 अखेर 25.63 मिलीयन वरून ऑगस्ट 22 अखेर 25.97 मिलीयन झाली. 1.34 टक्के मासिक वाढीसह वायरलाइन ग्राहकांची निव्वळ वाढ 34 हजार होती. एकूण वायरलाइन ग्राहकांमध्ये शहरी आणि ग्रामीण ग्राहकांचा वाटा ऑगस्ट-20 अखेरीस अनुक्रमे 92.35 टक्के आणि 7.65 टक्के होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com