लॉकडाऊनमध्येही जिओची भरभराट; फेसबुक, सिल्वर लेक नंतर 'या' तिसऱ्या कंपनीची गुंतवणूक

वृत्तसंस्था
Friday, 8 May 2020

लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानींच्या रिलायंस जिओ कंपनीची मोठ्या प्रमाणात भरभराट होताना दिसत आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्येही मुकेश अंबानींच्या रिलायंस जिओ कंपनीची मोठ्या प्रमाणात भरभराट होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत फेसबुक आणि सिल्व्हर लेक अशा नामवंत कंपन्यांपाठोपाठ आता विस्टा इक्विटी पार्टनर्स या मोठ्या अमेरिकन कंपनीने जिओमध्ये तब्बल ११,३६७ कोटीची गुंतवणूक करून रिलायन्स जिओमधील २.३२ टक्के शेअर्स विकत घेतले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भारतातील उद्योगांचे तीनतेरा वाजले असतानाच रिलायंस जिओसाठी ही मोठी खूशखबर आहे. विस्टाच्या या गुंतवणुकीची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी असून एन्टरप्राईज व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी इतकी असल्याची माहिती रिलायन्सकडून देण्यात आली आहे. विस्टा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेली गुंतवणूक संस्था आहे. आमच्या इतर भागीदारांप्रमाणेच विस्टा भारतातील डिजिटल बाजारपेठेचा विकास करण्यासाठी उत्सुक असल्याचे रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले. 

धक्कादायक ! बीएसएफच्या २ जवानांचा कोरोनाने मृत्यू

लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय कंपन्यांच्या व्यवसायाचे गणित बिघडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात असतानाच सिल्व्हर लेक या कंपनीने रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ५६५५.७५ कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. तर फेसबुकने तब्बल ४३ हजार कोटीची गुंतवणूक करत रिलायन्स जिओमधील ९.९ टक्के शेअर्स विकत घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Jio Sells 2.3% Stake to US Tech Fund Vista Equity Partners