दिलासादायक! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; अजून कमी होऊ शकतात किंमती

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 September 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (cruid oil) किंमती खाली आल्या आहेत आणि रुपया वधारला आहे. यामूळे पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून घसरतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

 नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी ( Oil Marketing Companies- OMCs) पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या  (Petrol Deisel Prices) दोन्हीच्या किंमती कमी केल्या आहेत. यामुळे सोमवारी पेट्रोलच्या दरात 13 ते 14 पैशांची घट झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 14 ते 16 पैशांची घट झाली होती. यापूर्वीच्या एक दिवस आधी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा कपात करण्यात आली होती. ज्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 53 पैसे घट झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 81.55 रुपये तर डिझेल 72.36 रुपये प्रति लिटरवर आले आहे.  दररोज सकाळी 6 वाजेपासून नवीन दर लागू होत असतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

 जन्मठेप म्हणजे किती वर्षांची शिक्षा? आजीवन कारावास की १४ वर्ष? वाचा सविस्तर...

 पेट्रोल 2 रुपयांपर्यंत स्वस्त असू शकते-
 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (cruid oil) किंमती खाली आल्या आहेत आणि रुपया वधारला आहे. यामूळे पेट्रोल डिझेलच्या किंमती अजून घसरतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.  कच्च्या तेलामध्ये 20 टक्के कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलमध्ये 5 टक्क्यांनी स्वस्त होऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अडीच ते तीन रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.

 मुघल म्युझियमला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव; CM योगींनी केले नामकरण...

 देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती-
- पुणे पेट्रोल 88.47 रुपये तर डिझेलचे दर 78.21 रुपये प्रतिलिटर    
 -दिल्ली पेट्रोल 81.55 रुपये तर डिझेल 72.56 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबई पेट्रोलची किंमत 88.21 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 79.05 रुपये आहे.
 -कोलकाता पेट्रोल 83.06 रुपये तर डिझेल 76.06 रुपये प्रतिलिटर आहे.
- चेन्नई पेट्रोल 84.57 रुपये आणि डिझेलची किंमत 77.91 रुपये प्रतिलिटर आहे.
- नोएडा पेट्रोल 81.95 रुपये तर डिझेल 72.87 रुपये प्रतिलिटर आहे.
- गुरुग्राम पेट्रोल 79.72 आणि डिझेल 73.03 रुपये प्रतिलिटर आहे.
- लखनौ पेट्रोल 81.85 आणि डिझेल 72.77 रुपये प्रतिलिटर आहे.
-पटना पेट्रोल 84.13 रुपये तर डिझेल 77.87 रुपये प्रतिलिटर आहे.
- जयपूर पेट्रोल 88.73 रुपये आणि डिझेल 81.53 रुपये प्रति लिटर आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief for common man petrol-diesel became cheaper today