‘हो, धर्मसुद्धा कधी कधी अंधश्रद्धा होते’| Akhilesh Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

‘हो, धर्मसुद्धा कधी कधी अंधश्रद्धा होते’

कधी कधी धर्मही अंधश्रद्धा (Religion is also superstition) होते. समाजवादी पार्टीचे (samajwadi party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी एका मुलाखतीत भाजपला वेठीस धरत भगव्या पक्षाने याला मोठा मुद्दा बनवायला सुरुवात केली आहे. अखिलेश यादव यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागावी, असे भाजपने म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

मुलाखतीत त्यांना विचारले की ते कधीही नोएडाला का गेले नाही. कारण, असे मानले जाते की तेथे गेले की कधीही मुख्यमंत्री होत नाही. आमचे बाबा मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) तेथून आले आहेत. आता ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. अँकरने याला अंधश्रद्धा म्हटल्यावर अखिलेश म्हणाले, ‘हो, धर्मसुद्धा कधी कधी अंधश्रद्धा (Religion is also superstition) होते.

हेही वाचा: MPSC Exam : परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

भाजपच्या (BJP) ट्विटर हँडलवरून मुलाखतीचा हा भाग ट्विट करताना लिहिले की, निवडणुकीपुरत्या हिंदूंना धर्म अंधश्रद्धा वाटते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही अखिलेश यादव यांच्या या विधानावर टीका केली. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी लोकांची माफी मागावी. धर्माला अंधश्रद्धा सांगून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी माफी मागावी अशी माझी इच्छा आहे.

मी हा भ्रम तोडण्यासाठी आलो आहे. जो नोएडाला जातो तो आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही, असे म्हटले होते. मी माझा कार्यकाळ पूर्ण केला असून भविष्यातही आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी त्याच टीव्ही चॅनलवरील मुलाखतीत नोएडा अंधश्रद्धेवर उत्तर दिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top