ASI च्या संरक्षणाखाली 'कुलूपबंद' मंदिरं पूजेसाठी होणार खुली; 1958 च्या कायद्यात होणार बदल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ancient Temples

सध्या देशात सुमारे 3,800 वारसा स्थळे ASI च्या संरक्षणाखाली आहेत.

ASI च्या संरक्षणाखाली 'कुलूपबंद' मंदिरं पूजेसाठी होणार खुली

नवी दिल्ली : भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या (Archaeological Survey of India, ASI) संरक्षणाखाली बंद मंदिरांमध्ये धार्मिक उपक्रम सुरू करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. अशा मंदिरांमध्ये पूजा करण्यास परवानगी देण्यासाठी 1958 च्या कायद्यात सुधारणा केली जाऊ शकते. सरकार हिवाळी अधिवेशनात (Winter Session) यासंबंधी दुरुस्ती विधेयक मांडू शकतं, त्यामुळं या मंदिरांची देखभाल सोपी होईल, असा यामागचा विचार आहे.

उच्च दर्जाच्या सरकारी सूत्रांनुसार, सध्या देशात सुमारे 3,800 वारसा स्थळे ASI च्या संरक्षणाखाली आहेत. यामध्ये एक हजाराहून अधिक मंदिरे आहेत. यापैकी केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर (Padmanabhaswamy Temple) आणि उत्तराखंडमधील जागेश्वर धाम (Jageshwar Dham in Uttarakhand) अशी फारच कमी मंदिरे आहेत, जिथं पूजा केली जाते. बहुतेक मंदिरे बंद आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे. त्यापैकी जम्मू-काश्मीरमध्ये मार्तड मंदिरासारखी अनेक मंदिरे आहेत, ज्यांचे अवशेष अवशेषांच्या रूपात शिल्लक आहेत. अलीकडेच एएसआयनं स्थानिक प्रशासनाला पत्र लिहून जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या मार्तड मंदिरात केलेल्या पूजेवर तीव्र आक्षेप नोंदवला होता.

अनेक प्राचीन मंदिरं 'कुलूपबंद'

वास्तविक, प्राचीन स्मारकं व पुरातत्व स्थळं आणि अवशेष अधिनियम 1958 अंतर्गत संरक्षित मंदिरांमध्ये धार्मिक क्रियाकलापांना परवानगी नाहीय. सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'मंदिरांचं जतन करण्याच्या उद्देशानं कायदा पूर्ण केला जात नाहीय. याउलट मंदिरांची अवस्था बिकट होत असल्यानं लोकांच्या प्रवेशावरही बंदी आहे. एएसआयनं ही मंदिरं जतन केली आहेत. परंतु, त्यांची काळजी घेण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. अनेक मंदिरांची वर्षातून एकदा साफसफाई केली जाते, तर उर्वरित वेळी ते कुलूपबंदच राहतात. पूजा आणि इतर धार्मिक कार्यांना परवानगी दिल्यानं त्या ठिकाणांची देखभाल तर होईलच, पण त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांचा सहभागही वाढेल.'

हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना ED ची नोटीस; म्हणाले, ### दम असेल तर मला उचलून दाखवा

सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'ASI संरक्षणाखाली बंद असलेल्या मंदिरांची परिस्थिती वेगळी आहे. अनेक मंदिरांमध्ये मूर्ती खंडित अवस्थेत असून अनेक ठिकाणी मूर्तीच नाहीत. अशी अनेक मंदिरं हिंदू राज्यकर्त्यांच्या किल्ल्यात आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मंदिराच्या नावावर केवळ अवशेष उरले आहेत. अशा सर्व मंदिरांचं वर्गीकरण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या मंदिरांमध्ये मूर्ती चांगल्या स्थितीत आहेत आणि इमारतीची स्थितीही चांगली आहे, तिथं तात्काळ पूजा करण्यास परवानगी दिली जाऊ शकते.'

Web Title: Religious Activities Will Be Allowed In Closed Temples Under The Protection Of Archaeological Survey Of India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UttarakhandTemples
go to top