

prayagraj shiv temples tourism
esakal
त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजमधील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील चार प्राचीन शिवमंदिरांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून, यासाठी एकूण ५.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे संगमाव्यतिरिक्त जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या योजनेत जसरा येथील पाथरबांधी महादेवालय, प्राचीन भोलेगिरी मंदिर, बोलन महादेव मंदिर आणि घीनपूर येथील प्राचीन शिवाला मंदिर यांचा समावेश आहे. मंदिरांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व जपून भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.