esakal | BREAKING: अयोध्येत खोदकामात मिळाले भव्य प्राचीन शिवलिंग आणि.... 

बोलून बातमी शोधा

Remains of an ancient temple have been found

अयोध्या राम जन्मभूमी परिसरात 11 मे पासून मंदिरासाठी सपाटीकरणाचे काम सुरु असून परिसरात अनेक प्राचीन मंदिराचे अवशेष मिळाले आहे

BREAKING: अयोध्येत खोदकामात मिळाले भव्य प्राचीन शिवलिंग आणि.... 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अयोध्या (उत्तर प्रदेश): अयोध्येत गेल्या अनेक वर्षांपासून भव्य राम मंदिर बनविण्यासाठी सर्वच रामभक्त आग्रही होते. अयोध्या हि प्रभू श्री राम यांची जन्मभूमी असल्याने सर्वांसाठी भव्य राम मंदिर हा एक भावनिक विषय होता. अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणानंतर त्या ठिकाणी कोणतेही प्रकारचे बांधकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली होती. 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिल्याने रामजन्मभूमीच्या त्या 2. 77 एकर जमिनीवर राम लल्ला ला मालकी हक्क मिळाल्याने त्या ठिकाणी आता भव्य राम मंदिर बनविण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरु करण्यात आले आहे. देशभरात लॉकडाऊन असताना सुद्धा अयोध्येत 11 मे पासून मंदिरासाठी जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. आता या सपाटीकरणाच्या कामात याठिकाणी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आतापर्यंत कोणते अवशेष मिळाले:
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भव्य राम मंदिराचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाचा एक भाग म्हणून 11 मे पासून राम जन्मभूमी परिसरात जमीन सपाटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला असून या ठिकाणी एक भव्य प्राचीन शिवलिंग सुद्धा सापडले असल्याचे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवी- देवतांचे प्राचीन शिल्पांचे अवशेष सुद्धा मिळाले आहेत. या ठिकाणी 7 मोठे ब्लॅक टच दगडाचे स्तंभ, 6 लाल दगडी स्तंभ मिळाले आहेत. त्यासोबतच या ठिकाणी खोदकामात अनेक प्राचीन कलश, पुष्प, आंबलीक यासारख्या ऐतिहासिक मौल्यवान वस्तू मिळाल्यामुळे या कामाचे महत्व वाढले आहे. 

1999 पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळाच्या घटनांवर एक नजर

राम जन्मभूमीत सध्या कोणते काम सुरु: 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमीत आता भव्य राम  मंदिराचे काम हाती घेण्यात आले आहे. देशभरात लॉकडाऊन असताना सुद्धा विशेष परवानगी मिळाल्यानंतर याठिकाणी सुरु असलेले काम मोठ्या युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या राम जन्मभूमी परिसरातील संपूर्ण 2.77 एकर जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच राम जन्मभूमीत मिळालेल्या प्राचीन अवशेषांचे साफ सफाईचे काम सध्या या ठिकाणी सुरु करण्यात येत आहे. राम जन्मभूमी न्यास कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या शिळांचे सुद्धा सफाईचे काम सध्या सुरु आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला होता निर्णय: 
9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत राम जन्मभूमीची संपूर्ण 2.77 एकर जमीन हि राम लल्ला ला दिली. या ठिकाणी राम मंदिराच्या निर्माणासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला एक ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सुद्धा दिले. 5 न्यायाधीशांच्या समितीने एकमताने निर्णय घेत सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा आदेश सुद्धा दिला आहे.