Manipur Violence : महामार्गावरील अडथळे दूर करा; अमित शहांचा मणिपूरमधील आंदोलकांना आवाहन

आपण सर्व एकत्र आलो तरच मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करू शकतो, असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले
remove roadblocks Amit Shah appeal on twitter protesters in Manipur
remove roadblocks Amit Shah appeal on twitter protesters in Manipur esakal

नवी दिल्ली : मणिपूर येथील इंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलनादरम्यान निर्माण करण्यात आलेले अडथळे दूर करून, या मार्गावरून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होऊ देण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले आहे.अमित शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आंदोलकांना आवाहन करताना म्हणाले की, ‘‘मणिपूर येथील नागरिकांना मी आवाहन करतो की.

त्यांनी एनएच-२ वरील अडथळे दूर करावेत. येथील समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी याबाबत पुढाकार घ्यावा. हे अडथळे दूर केल्यास अन्न, औषधे यांसह जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करता येईल,’’ आपण सर्व एकत्र आलो तरच मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करू शकतो, असे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले.

remove roadblocks Amit Shah appeal on twitter protesters in Manipur
Manipur Violence: पीडितांना केंद्राचा दिलासा! मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई

शांततेसाठी ‘जीएमएफ’चा पुढाकार

मूळच्या मणिपूर येथील रहिवासी असलेल्या अनिवासी भारतीयांनी रविवारी मणिपूर येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. ग्लोबल मणिपूर फेडरेशन (जीएमएफ) या संस्थेने, मणिपूर मधील सामाजिक तेढ कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. मणिपूर मध्ये झालेल्या हिंसाचाराने जगभर पसरलेले मणिपूरचे नागरिक व्यथित असल्याचे या संस्थेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

remove roadblocks Amit Shah appeal on twitter protesters in Manipur
Manipur Violence: पीडितांना केंद्राचा दिलासा! मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई

आपल्याच गावात निर्वासित

ग्लोबल मणिपूर फेडरेशन (जीएमएफ) या संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमधील हिंसाचारानंतर येथील कित्येक नागरिकांवर त्यांच्याच गावात निर्वासितांसाठीच्या केंद्रावर आश्रय घेण्याची वेळ आली आहे, हे फार वेदनादायी आहे. येथील नागरिकांना भयंकर मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांना या सर्वांतून बाहेर काढणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com