
अहमदाबाद : सध्या गुजरात दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज स्वपक्षीयांनाच आरसा दाखवत उपदेशाचे डोस पाजले. भाजपसाठी काम करणारे नेते आणि कार्यकर्त्यांना दूर करा. प्रसंगी २०-३० लोकांना बाहेरचा रस्ता दाखवितानाही तुम्ही मागे पुढे पाहता कामा नये असे त्यांनी नमूद केले.