
बोइंग कंपनीच्या ड्रीमलायनर ७८७-८ या विमानामध्ये मागील काही काळात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्याच्या घटना घडल्या आहेत. या बनावटीच्या एका विमानात हायड्रॉलिक गळती आणि विमानाचे फ्लॅप योग्य पद्धतीने कार्य करत नसल्याच्या तक्रारीमुळे या विमानाची २५ दिवसांत अनेक वेळा उड्डाणे रद्द करण्यात आली होती.