भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NFHS
भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला

भारतीय दोन मुलांवरच ठाम, प्रजनन दर घटला

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चा रिपोर्ट नुकताच आला असून, यात भारतातीतल प्रजनन दर कमालीचा घटल्याचं समोर आलंय. देशातील जन्मदर हा २.२ टक्क्यावरुन २ टक्के झालाय. राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षण करताना गर्भनिरोधकाचा वापर करणे ही महीलांची जबाबदारी असल्याचं पुरुषांचं म्हणंण आहे. तर 19.6 टक्के पुरुषांना गर्भनिरोधकाचा वापर करणाऱ्या महिला स्वच्छंद असतात अशी मानसिकता आहे. (National Family health survey)

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण देशातील २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ७०७ जिल्ह्यांमध्ये हा सर्वे करण्यात आलाय.जवळजवळ ६ लाथ ३७ हजार जणांशी बोलून हा सर्वेक्षण करण्यात आलाय. शुक्रवारी हा सर्वे जारी करण्यात आलाय. भारतात बिहार, मेघालय, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मणिपूर या पाच राज्यात २ पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला जातोय. इतर राज्यांमध्ये मात्र दोन मुलांवरच कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला जातोय.

गर्भनिरोधकांच्या वापराविषयीची वाढलेली जागरुकता देखील, जन्मदर नियंत्रित करण्यात महत्वाची ठरतेय. मात्र आर्थिक निम्न स्तरातील वर्गात कुटुंबनियोजनाची गरज अधिक असल्याचं समोर येतंय. तर उच्च मध्यमवर्गीयांमध्ये कमी गरज असल्याचं समोर आलंय. गर्भनिरोधकांच्या वापरासाठी खर्च करणं आर्थिक स्थितीवर अवलंबून असल्याचं या सर्वेत लक्षात आलंय.या डेटामधून विकास हाच उत्तम गर्भनिरोधक असल्याचं आपण म्हणू शकतो,असं पॉप्युलेशन फांऊडेशन ऑफ इंडिया च्या एक्झिक्युटीव डायरेक्टर पूनम मुतरेजांनी सांगितलं.

Web Title: Reproduction Rate Declined In India Nfhs Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :familyHealth Minister
go to top