

Republic Day 2026
sakal
Women commando Republic Day Uttar Pradesh : ७७ वा प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२६) उत्तर प्रदेश आणि विशेषतः पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. यंदाची परेड पूर्णपणे 'मिशन शक्ती' मोहिमेला समर्पित असेल, जिथे पहिल्यांदाच महिला कमांडो पथक आपल्या शौर्याचे प्रदर्शन करताना दिसेल.
यंदाची परेड ही केवळ औपचारिकता नसून महिला सक्षमीकरणाचे एक जिवंत उदाहरण असेल. आयुक्तालय प्रशासनाने प्रथमच परेडची संपूर्ण सूत्रे महिलांच्या हाती सोपवली आहेत.