अँटिबॉडीजमुळे कोरोनापासून संरक्षण नाही; संशोधकांचा दावा 

वृत्तसंस्था
Wednesday, 9 September 2020

काही दिवसांपूर्वी शरीरातील अँटिबॉडीजमुळे मानवी शरीरात काही सकारात्मक परिणाम घडून येत असल्याचे आढळून आले होते. संशोधक आता या परिणामांचा गांभीर्याने अभ्यास करत आहेत.

नवी दिल्ली - मानवी शरीरातील अँटिबॉडीज अथवा प्रतिपिंडांमुळे व्यक्तीचे नेहमीच कोरोना अथवा सार्सच्या विषाणूंपासून संरक्षण होत नाही. या अँटिबॉडीज मानवी शरीरामध्ये कितीकाळ टिकतात किंवा टिकाव धरणारे त्यांचे अन्य उपप्रकार कोणते आहेत, याचा अंदाज वर्तविणे कठीण असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपूर्वी शरीरातील अँटिबॉडीजमुळे मानवी शरीरात काही सकारात्मक परिणाम घडून येत असल्याचे आढळून आले होते. संशोधक आता या परिणामांचा गांभीर्याने अभ्यास करत आहेत. अँटिबॉडीजच्या प्रभावाबाबत संशोधकांमध्ये मतैक्य नाही, याबाबत केवळ वेगवेगळे अंदाजच वर्तविण्यात येतात, एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या अँटिबॉडीज आढळून आल्या तर त्यावरून एक निष्कर्ष मात्र निश्‍चितपणे काढता येतो तो म्हणजे त्या व्यक्तीला या आधी कोरोनाची बाधा झाली होती. संशोधनातून आता हाती आलेले पुरावे आपल्याला नेमके कोणत्या दिशेला घेऊन जातात, हे काळजीपूर्वक पाहावे लागेल असे विषाणूतज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रभाव उघड नाही
शरीराच्या विविध भागांमध्ये अँटिबॉडीजची निर्मिती होते, असे पुण्यातील आयसर संस्थेतील संशोधक विनिता बाल यांनी सांगितले. देशात याआधी अनेक भागांत सिरो सर्व्हे करण्यात आले होते; पण त्यातूनदेखील अँटिबॉडीजचा प्रभाव उघड झालेला नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Researchers claim Antibodies do not protect against corona

Tags
टॉपिकस
Topic Tags: