दिल्लीत पुन्हा निर्बंधांचे दिवस! मुख्यमंत्र्यांकडून यलो अलर्ट जाहीर

Arvind Kejriwal
Arvind KejriwalArvind Kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याने निर्बंधांचे (Lockdown) दिवस (Restrictions in Delhi again) परत येऊ लागले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी कोरोना संकटासंदर्भात बैठक घेतली आणि यलो अलर्ट (CM issues yellow alert) लागू करण्याची घोषणा केली. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन अंतर्गत दिल्लीमध्ये लेव्हल-१ अलर्ट म्हणजेच यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच सविस्तर आदेश जारी केला जाईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. (Restrictions in Delhi again)

यलो अलर्ट (CM issues yellow alert) लागू झाल्यास अनेक प्रकारचे निर्बंध जाहीर केले जाऊ शकतात. दिल्लीत कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या नियमांनुसार पिवळा, अंबर, केशरी आणि लाल अलर्टची तरतूद आहे. दिल्लीत यापूर्वीच रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

Arvind Kejriwal
तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

याशिवाय यलो अलर्ट अंतर्गत (CM issues yellow alert) शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था आणि शैक्षणिक संस्था बंद (Schools, colleges can be closed) ठेवल्या जाऊ शकतात. विना-आवश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने आणि मॉल्स सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. खासगी कार्यालयांची वेळही ९ ते ५ या वेळेत करता येऊ शकते. तसेच एकूण क्षमता ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

रेस्टॉरंटमध्ये फक्त ५० टक्के लोक

यलो अलर्ट अंतर्गत (CM issues yellow alert) एकूण क्षमतेच्या फक्त ५० टक्के रेस्टॉरंटमध्ये बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय ते उघडण्याची वेळ देखील सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत निश्चित केली जाऊ शकते. ५० टक्के क्षमतेचा नियम बारमध्ये देखील लागू होऊ शकतो. सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, बँक्वेट हॉल आणि ऑडिटोरियम बंद ठेवता येतील. हॉटेल्स खुली ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. हा फक्त अंदाज आहे. या संदर्भात दिल्ली सरकार लवकरच सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर (Restrictions in Delhi again) करण्यात येतील.

Arvind Kejriwal
VIDEO : खासदार नवनीत राणा धावण्यातही अव्वल; महिलांना दिला सल्ला

विवाह, अंत्यसंस्कारात २० ची मर्यादा

क्रीडा संकुल, स्टेडियम, जलतरण तलाव आदी बंद करण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. विवाह आणि अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या २० पर्यंत मर्यादित असू शकते. धार्मिक स्थळे खुली राहू शकतात. परंतु, भाविकांची संख्या मर्यादित असू शकते. याशिवाय सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंदी घालता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com