

TAVI surgery at riims jharkhand
esakal
झारखंड: झारखंडमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्था अर्थात रिम्समध्ये हृदयविकाराच्या उपचार क्षेत्रात महत्त्वाचे यश मिळाले आहे. रिम्सच्या कार्डिओलॉजी विभागात प्रथमच ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI) प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. रिम्सच्या माहितीनुसार, झारखंडमधील कोणत्याही सरकारी रुग्णालयात यशस्वी झालेली ही पहिली TAVI प्रक्रिया आहे. कार्डिओलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मृणाल कुंज यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने ही प्रक्रिया पूर्ण केली.