esakal | आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Aadityanath

आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ - आधीच्या सरकारच्या राजवटीत दर तीन दिवसांनी दंगल (Riot) व्हायची. त्यामुळे विकासात अडथळे येऊन राज्याची पीछेहाट झाली होती, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी केला.

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचा उल्लेख न करता ते म्हणाले की, २००३ ते २०१७ दरम्यान शासन केलेल्यांकडे विकासाची दूरदृष्टी नव्हती. सामान्य माणसाला व्यवसाय आणि रोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात त्यांना अपयश आले. या कालावधीत कोणताही सण शांततेत साजरा होऊ शकला नाही. त्यासाठी सुरक्षा पुरविण्यात आधीचे सरकारे अपयशी ठरली. अनागोंदी, गुंडगिरी, गैरव्यवस्थापनाचा फटका बसला. युवकांसमोर अस्तित्व हीच समस्या ठरली. उत्तर प्रदेशात आधीच्या राजवटीत केवळ दोन्ही गटांची वित्त आणि जिवीत हानी झाली. यात अखेरीस राष्ट्राचे नुकसान झाले.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टात एकाचवेळी ९ न्यायाधीशांसोबत 'हे' पहिल्यांदाच घडलं!

आपले सरकार आल्यानंतर उद्योगस्नेही वातावरणाच्या क्रमवारीत राज्याने १४वरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. परदेशी गुंतवणूकदारांच्या पसंतीमध्ये हे राज्य पहिल्या तीन क्रमांकांत आहे. कोरोनाच्या जागतिक साथीत चीन ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गमावत असताना उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य बनले.

- योगी आदित्यनाथ

loading image
go to top