New delhi : लहान मुलांतील श्वसनविकार बळावण्याचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi-Pollution

लहान मुलांतील श्वसनविकार बळावण्याचा धोका

नवी दिल्ली, ता.१३ ः दिवाळीनंतर दिल्लीत कुंद वातावरण आहे. धूर व धुके यांचे मिश्रण (स्मॉग) हवेत भरून राहिल्याने डोळे जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या समस्या दिल्लीकरांना भेडसावत आहेत.

लहान मुलांचे तर आरोग्यच धोक्यात आले असून तिघामागे एका बालकाला अस्थमा व गंभीर श्वसनविकार घेऊनच पुढचे आयुष्य काढावे लागणार आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. भारतातील सर्वांत १० प्रदूषित शहरांत उत्तरप्रदेशातील ५ शहरांचा समावेश आहे. जगातील सर्वांत घातक १० प्रदूषित शहरांत दिल्ली ‘टॉप''ला असण्याची लाजिरवाणी परिस्थिती सातत्याने गेली काही वर्षांपासून अनुभवायला मिळते आहे. राज्य व केंद्र सरकारच्या टोलवाटोलवीत दिल्लीकरांचा जीवच पणाला लागल्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाशी संबंधित ‘आयक्यू-एयर' या गटाने जी नवी यादी जारी केली त्यात दिल्लीबरोबरच मुंबई, कोलकत्याचाही समावेश आहे.

loading image
go to top