आसाममध्ये नदीत लागली भीषण आग, कशी काय?

वृत्तसंस्था
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

नदीत आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावार व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या ठिकाणची तेलगळती पाहून आग लावल्याचा संशय आहे. तीन दिवसांनंतर प्रशासनाला या आगीबाबत माहिती देण्यात आली.

दिब्रुगड : आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात एक  आश्चर्यकारक घटना समोर आली असून, नदीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रुगड जिल्ह्यातील नागरकटीया येथील ससोनी गावाजवळून वाहत असलेल्या नदीत भीषण आग लागली. कारण, नदीत पाण्याखालून तेलाची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन फुटल्याने ही आग भडकली. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. 

नदीत आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावार व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी या ठिकाणची तेलगळती पाहून आग लावल्याचा संशय आहे. तीन दिवसांनंतर प्रशासनाला या आगीबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत आग आणखी भडकली होती. परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: river catches fire in Dibrugarh district of Assam