लग्न समारंभ ठरलं अखेरचं; घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांना डंपरने चिरडले, 13 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 20 January 2021

कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईहुडी जिल्ह्यात मंगळवार-बुधवारच्या रात्री भीषण अपघात झाला आहे.

कोलकाता- कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईहुडी जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात रात्री वाहन अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार जलपाईगुडीच्या धुपगुडीमध्ये मंगळवारी रात्री उशीरा एक डंपर मयनातली मार्गे जात होते. यादरम्यान दृश्यता कमी असल्याने डंपरने अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर डंपर पलटला आणि त्याच्या खाली आलेल्या 13 लोकांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत आणि जखमी झालेले लोक एक लग्न समारंभ पार पाडून घरी परतत होते.

मृतांची संख्या वाढण्याची भीती

घटनेची माहिती मिळतात पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली होती. अपघातात किती लोक जखमी झालेत याची माहिती नाही. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धुक्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road accident happened in jalpaigudi of west bengal 13 people killed

Tags
टॉपिकस
Topic Tags: