कर्नाटकहून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 7 ठार

Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime Newsesakal
Summary

मुख्यमंत्री योगींनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.

नानपारा-लखीमपूर महामार्गावर (Nanpara-Lakhimpur Highway) नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची (Truck-Travels Accident) समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Motipur Police Station) नानपारा-लखीमपूर महामार्गावरील नैनिहा गावाजवळ (Nainiha Village) रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींना सीएचसीमधून बहराइच मेडिकल कॉलेजमध्ये (Bahraich Medical College) पाठवण्यात आलंय.

Uttar Pradesh Crime News
अमेरिकन अभिनेता BO Hopkins यांचं निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हे प्रवासी कर्नाटकातून लखीमपूरमार्गे अयोध्येला जात होते, असं सांगण्यात येतंय. मात्र, पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीय. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एसएसपी केशव कुमार चौधरी (SSP Keshav Kumar Chaudhary) यांनी अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलीय. पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींची काळजी घेत त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोठी बातमी! साकेत न्यायालयाच्या न्यायाधीशानं पत्नीसह केली आत्महत्या

मुख्यमंत्री योगींनी दु:ख व्यक्त केलं

सीएम योगी (Yogi Adityanath) यांनी बहराइच जिल्ह्यात (Bahraich District) झालेल्या रस्ते अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com