esakal | रॉबर्ट वाड्रांना पत्नीच्या भेटीची परवानगी नाही; भावनिक होऊन म्हणाले, 'प्रियांकाच्या अटकेने...'
sakal

बोलून बातमी शोधा

Robert Vadra

रॉबर्ट वाड्रांना पत्नीच्या भेटीची नाकारली परवानगी; म्हणाले, 'प्रियांकाच्या अटकेने...'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेकडे आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होतो आहे. या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेऊन एका खोलित नजरकैदेत ठेवलं होतं. तब्बल 30 तासांनंतर त्यांची अधिकृतरित्या अटक करण्यात आली. सध्या त्या अटकेतच आहेत. त्यांच्या अटकेची ही प्रक्रिया कायद्याला धरुन अजिबातच नसल्याची भूमिका काँग्रेसने मांडली आहे. याबाबत आता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. आपल्या मनातल्या भावना स्पष्टपणे मांडत त्यांनी फेसबुकवरुन आपण आता तातडीने लखनऊकडे रवाना होत असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा: महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ; डिझेल शंभरीजवळ

काय म्हटलंय वाड्रांनी?

रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय की, माझ्या पत्नीला भेटून ती सुखरुप आहे की नाही हे पाहण्यासाठी निघालो असताना मला लखनऊला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. प्रियांकाला कलम 151 अंतर्गत अटक कशी काय होऊ शकते, याबाबत धक्क्यात आहे. मी तिच्याशी काल बोललो आणि ती म्हणाली की, तिला कोणत्याही प्रकारचा आदेश अथवा नोटीस आधी देण्यात आलेली नाहीये. तसेच तिला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरही हजर करण्यात आलं नाही, ना तिला कायदेशीर मदत घेऊ देण्यात आली.

पुढे त्यांनी म्हटलंय की, मी आता तिच्याबद्दल खूपच चिंतेत आहे. एअरपोर्टवरुन मला बाहेर पडता येण्याची परवानगी देता येणार नसल्याची माहिती मिळताच मी आता बॅग पॅक करुन लखनऊकडे रवाना होतो आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे की, एक पती म्हणून मला माझ्या पत्नीला आधार देण्यासाठी जाता येण्याची परवानगी सुद्धा नाकारण्यात येत आहे. किमानतिला जनसमुहाचा पाठिंबा आहे, त्याबद्दल खूपच हायसं वाटतंय. पण माझ्यासाठी माझं कुटुंब आणि माझी पत्नी सर्वांत आधी येते. मी अशी आशा करतो तिला लवकरच सोडलं जाईल आणि ती घरी सुरक्षितरित्या परतेल.

हेही वाचा: Gold Rate : सोन्याचे भाव किंचित वधारले; तपासा लेटेस्ट भाव

राहुल गांधींनाही नाकारली परवानगी

योगी आदित्यनाथ सरकारने मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी कुणालाच देऊ केली नाहीये. लखीमपूरला जाणाऱ्या विरोधकांना परवानगी नाकारण्यात येत असून त्यांना एअरपोर्टवरच अडवण्यात येत आहे. काल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रियांका गांधींच्या भेटीसाठी निघाले असता त्यांना एअरपोर्टवरच अडवण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारली आहे. लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेश सरकारने जमावबंदीचं १४४ कलम लागू केलं आहे.

loading image
go to top