

rohit pawar
esakal
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या अपघात प्रकरणातील गंभीर अनियमिततांवर बोट ठेवले. या प्रकरणी संबंधित विभागातील उच्चपदस्थ नेत्याने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी यापूर्वीही या अपघाताच्या तपासात मोठ्या नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचे आरोप केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी त्या मुद्द्याला नवी दिशा दिली आहे.