Development Model : देशातील वाढत्या आर्थिक असमानतेची कारणे विकासाच्या सध्याच्या मॉडेलमध्ये आहेत, असा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला. कॉर्पोरेट क्षेत्राला झुकते माप देणे थांबवून, जीएसटीत सुधारणा करून परिस्थिती सुधारता येईल, असा त्यांचा सल्ला आहे.
नवी दिल्ली : समाजातील वाढत्या असमानतेची मुळे देशाच्या आर्थिक विकासाच्या मॉडेलमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी समाज माध्यमातून केला.