RRB Group-D Recruitment 2025: रेल्वे भरती बोर्डाने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील ३२ हजार ४३८ पदं भरली जाणार आहेत. .अर्ज करण्यसासाठी २३ जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे. २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांनी अपूर्ण कागदपत्रांच्या पूर्णत्वासाठी आतापासून तयारीला लागणं आवश्यक आहे..महत्त्वाच्या तारखाजाहिरातीची तारीख- २८ डिसेंबर २०२४अर्जाची तारीख - २३ जानेवारी २०२५अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वीपरीक्षेची तारीख- यथावकाश जाहीर होईल.विभाग, पद आणि जागा.नेमकी पात्रता काय?रेल्वे विभागात वर्ग चारमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असणं आवश्यक आहे. दहावी किंवा एनसीव्हीटीमधून एनएसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय १ जुलै २०२५ पर्यंत उमेदवाराचं वय १८ ते ३६ वर्षांच्या मध्ये असणं आवश्यक आहे. यामध्येही नियमांनुसार सूट मिळणार आहे..परीक्षेची फीग्रुप डीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी सर्वसामान्य आणि ओबीसी उमेदवारांना ५०० रुपये आणि एससी, एसटी,ईबीसी, महिला, ट्रान्सजेंडर यांच्यासाठी २५० रुपये भरावे लागतील..परीक्षेचा पॅटर्नभरती प्रक्रियेसाठी कम्प्युटर आधारित टेस्ट होईल. त्यानंतत शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी होईल.परीक्षेसाठी सामन्य विज्ञानाचे २५ प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, सामान्य ज्ञानावर आधारित ३० प्रश्न, सामान्य जागरुकता २० प्रश्न. याशिवाय चुकीच्या उत्तरासाठी १/3 अशा पद्धतीनुसार मार्क कापले जातील. बरोबर उत्तरासाठी एका प्रश्नाला एक मार्क असेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.