Haridwar Court : RSS ला कौरव म्हणणं राहुल गांधींना भोवणार; कार्यकर्त्यानं दाखल केला मानहानीचा खटला

राहुल गांधींना नुकतंच 'मोदी आडनाव' प्रकरणी सुरत न्यायालयानं एका मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलंय.
RSS Rahul Gandhi
RSS Rahul Gandhi esakal
Summary

न्यायाधीश शिव सिंह यांनी फिर्यादीला सुनावणीसाठी 12 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलंय.

हरिद्वार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यानं संघटनेला '21 व्या शतकातील कौरव' संबोधल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात हरिद्वार न्यायालयात (Haridwar Court) मानहानीचा खटला दाखल केलाय.

आरएसएस कार्यकर्ते कमल भदौरिया (Kamal Bhadauria) यांच्या वकिलानं सांगितलं की, 'राहुल गांधींविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत आरएसएसविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल केला आहे.'

या वर्षी 9 जानेवारीला हरियाणातील भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींनी '21 व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि शाखा चालवतात' असं म्हटलं होतं. त्यांच्या पाठीशी देशातील दोन ते तीन श्रीमंत लोक उभे आहेत, असंही ते म्हणाले होते.

RSS Rahul Gandhi
Giorgia Meloni : 'या' देशात इंग्रजीसह परदेशी भाषांवर येणार बंदी; English बोलल्यास भरावा लागणार मोठा दंड!

न्यायाधीश शिव सिंह यांनी फिर्यादीला सुनावणीसाठी 12 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलंय. भदौरियांच्या वकिलानं सांगितलं की, 'राहुल गांधींनी आरएसएसची तुलना 21 व्या शतकातील कौरवांशी केली. हे त्यांचं अशोभनीय बोलणं त्यांची मानसिकता स्पष्ट करते. आरएसएस ही अशी संघटना आहे, जी देशातील कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदतीसाठी पुढं येते.'

RSS Rahul Gandhi
LGBT Marriage : समलिंगी विवाहावर मुस्लिम संघटनेचं मोठं वक्तव्य; 'या' हिंदू परंपरेचा दिला हवाला

कमल भदौरिया यांच्या तक्रारीत पुढं म्हटलंय, 'राहुल गांधी म्हणाले की हा देश संन्याशांचा आहे, पुरोहितांचा नाही. असं सांगून त्यांनी संन्याशांची तपस्वी आणि पुरोहितांमध्ये विभागणी केली. त्यामुळं देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या तक्रार याचिकेत राहुल गांधींवर खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.

RSS Rahul Gandhi
Karnataka Election : भाजपला पराभवाची भीती? Exit Poll जाहीर होताच कर्नाटकात मोदींच्या तब्बल 20 सभा!

विशेष म्हणजे, राहुल गांधींना नुकतंच 'मोदी आडनाव' प्रकरणी सुरत न्यायालयानं एका मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलंय. त्यानंतर त्यांना लोकसभेतून खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं. याशिवाय, बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील न्यायालयानं राहुल गांधींना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सीआरपीसीच्या कलम 313 अंतर्गत त्यांचं म्हणणं नोंदवण्यासाठी 12 एप्रिलला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com