सनातन धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘श्रीकृष्ण गीतानुग्रह पुरस्कार’ प्रदान केला.
बंगळूर : प्रत्येक हिंदूने सनातन धर्माचे (Sanatan Dharma) जतन, पालनपोषण आणि संवर्धन केले पाहिजे. आणि त्यांच्या वचनबद्धतेबाबत खंबीर राहिले पाहिजे, यावर राष्ट्रीय स्वयंसेवर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भर दिला. उडुपी मठातील गीता मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धार्मिक नेते आणि संतांना आध्यात्मिक मूल्ये आणि राष्ट्रीय आदर्शांचे समर्थन करण्यासाठी समाजाला अधिक प्रभावीपणे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.