"मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण देण्याचे प्रयत्न आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत."
बंगळूर : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने (Congress Government) सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना (Muslim Reservation) ४ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर, ‘संविधान धर्मावर आधारित आरक्षणाला परवानगी देत नाही’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी येथे केले.