esakal | आरएसएस भारतातील तालिबान, RJD नेत्याची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

आरएसएस भारतातील तालिबान, RJD नेत्याची टीका

आरएसएस भारतातील तालिबान, RJD नेत्याची टीका

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आरजेडी आणि लालू प्रसाद यादव यांना धर्मनिरपेक्ष म्हणतानाच जगदानंद सिंह यांनी आरएसएसची तुलना तालिबानसोबत केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान जे काम करतेय तेच भारतात आरएसएस करत असल्याची टीका, जगदानंद सिंह यांना लगावला आहे. पाटण्यातील पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना जगदानंद सिंह यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तालिबान एक संस्कृती आहे, जी अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात आहे. तालिबान्यांना धार्मिक हिंसेसाठी ओळखलं जातं, असे सांगतानाच भारतामध्ये आरएसएससुद्धा हेच काम करत आहे. RSS लोकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते, असं वादग्रस्त वक्तव्य जगदानंद यांनी केलं. तालिबान आणि आरएसएसमधील फरक याबद्दल बोलताना जगदानंद यांनी हे वक्तव्य केलं. RSSची वाईट विचारसरणी भारतामधील संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचंही जगदानंद यांनी यावेळी म्हटलं. जगदानंद यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

जगदानंद यांनी आरएसएसबाबत केलेल्या वक्तव्याचं राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांकडून समर्थन असल्याचं दिसत आहे. पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जगदानंद यांचं वक्तव्य कोणत्याच पद्धतीने चुकीचं नसल्याचं सांगत पाठराखण केली आहे. आरएसएस ही संघटना कायमच देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते, असे मृत्युंजय तिवारी यांनी म्हटलेय.

loading image
go to top