
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच वयाच्या ७५ वर्षांनंतर मागे हटण्यासंबंधी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या संदर्भात बोलताना, “जेव्हा एखाद्याला ७५व्या वाढदिवसानिमित्त शाल पांघरली जाते, तेव्हा तो काळ मागे हटण्याचा असतो,” असं म्हटलं. मात्र या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत आणि त्याला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडलं गेलं आहे.