कन्हैया लालच्या हत्येनंतर RSS आक्रमक; मुस्लिम समाजाला दिला 'हा' सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil Ambekar

कन्हैया लालच्या हत्येमुळं देशात खळबळ उडाली असून भाजपही आक्रमक झालीय.

कन्हैया लालच्या हत्येनंतर RSS आक्रमक; मुस्लिम समाजाला दिला 'हा' सल्ला

नवी दिल्ली : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याप्रकरणी उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीची हत्या (Udaipur Kanhaiya Lal Murder Case) झाली. या हत्येमुळं देशात खळबळ उडाली असून भाजप आक्रमक झालीय. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही या घटनेचा निषेध नोंदवलाय.

राजस्थानमधील (Rajasthan Udaipur) उदयपूर येथील हिंदू शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय की, मुस्लिम समाजानं (Muslim Community) उदयपूरमधील हत्येसारख्या घटनांना तीव्र विरोध केला पाहिजे. कारण, देशातील हिंदू समाजानं या प्रकरणावर शांततापूर्ण आणि घटनात्मक पद्धतीनं प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना भेटणार का?, CM शिंदेंचं सूचक विधान

राजस्थानच्या झुंझुनू इथं प्रांत प्रचारकांच्या तीन दिवसीय बैठकीच्या समाप्तीनंतर आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर म्हणाले, “सर्वांनी एकत्रितपणे याला विरोध करणं आवश्यक आहे. 28 जून 2022 रोजी उदयपूरमधील कन्हैया लाल या ट्रेलरची त्याच्या दुकानात घुसून दोन मुस्लिम पुरुषांनी गळा चिरून हत्या केली होती." पीटीआयशी बोलताना आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी मुस्लिम समुदायांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावताना सार्वजनिक भावनांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कन्हैया लालची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: शिवसेनेचा सावंतांना मोठा धक्का; सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून केली हकालपट्टी

आंबेकर पुढं म्हणाले, "आपल्या देशात लोकशाही आहे. आम्हाला घटनात्मक लोकशाहीचा अधिकारही आहे. एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याचा लोकशाही मार्ग आहे. पण, अशा घटना ना समाजाच्या हिताच्या आहेत, ना देशाच्या. "एक सुसंस्कृत समाज अशा घटनेचा निषेध करतो. हिंदू समाज शांततापूर्ण आणि संवैधानिक पद्धतीनं प्रतिसाद देत आहे. मुस्लिम समाजानंही अशा घटनेला विरोध करणं अपेक्षित आहे. काही विचारवंतांनी याला विरोध केलाय. पण, मुस्लिम समाजानंही पुढं येऊन जोरदार विरोध केला पाहिजे."

Web Title: Rss On Muslim Community Amid Furore Over Kanhaiya Lal Udaipur Case Nupur Sharma

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..