

Rudranath Temple
esakal
उत्तराखंडमधील प्रसिद्ध 'पंच केदार' तीर्थक्षेत्रांपैकी चौथे केदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रुद्रनाथ धाम'चे (Rudranath Temple) कपाट सोमवार, १८ मे २०२६ रोजी दुपारी १२:४५ वाजता भाविकांसाठी अधिकृतपणे खुले करण्यात आले आहेत. समुद्रसपाटीपासून तब्बल ११,८०८ फूट (३,६०० मीटर) उंचीवर असलेल्या या दिव्य धामचे कपाट उघडताच संपूर्ण हिमालयीन परिसर 'हर-हर महादेव' आणि 'बाबा रुद्रनाथ' यांच्या जयघोषाने गुंजून निघाला.