Uttarakhand: सत्ता द्या, महिलांना दरमहा हजार रुपये देतो; केजरीवालांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Arvind-Kejriwal

सत्ता द्या, महिलांना दरमहा हजार रुपये देतो: केजरीवाल

काशीपूर: आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उत्तराखंडमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीनंतर गोवा, उत्तराखंड, पंजाब (Uttarakhand, Goa, Delhi, Punjab) अशा काही राज्यांमध्ये आपले हातपाय पसरता येतात का, याची तपासणी अरविंद केजरीवाल करत आहेत. यानिमित्ताने पक्षवाढीच्या संधीदेखील ते आजमावून पाहत आहेत. त्यामुळेच त्यांचे उत्तराखंड, गोवा, पंजाब अशा राज्यांमध्ये दौरे वाढीस लागलेले आहेत. या साऱ्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच त्यांनी आता उत्तराखंडमध्ये सत्ता आल्यास महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. एका जाहीर सभेत त्यांनी म्हटलंय की, आमचा पक्ष सत्तेवर आल्यास 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला ही रक्कम दिली जाईल.

हेही वाचा: Exam: म्हाडाची परीक्षा आता TCS घेणार; मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यातील इतर पक्षांवर टीका करताना त्यांनी सांगितलंय की, गेल्या वीस वर्षांत उत्तराखंडची अवस्था खराब झाली आहे. मी काही राजकीय नेता नाही. राजकारण कसं करायचं हे मला माहीत नाही. मला फक्त काम करायचं ठाऊक आहे. दिल्लीत (Delhi) आम्ही दहा लाख नोकऱ्या दिल्या आणि येथेही आम्ही ते करू. लोकांना नोकऱ्या कशा द्यायच्या हे मला माहीत आहे.

हेही वाचा: भज्जी उतरणार राजकीय मैदानात? सिद्धूंनी फोटोला दिलेल्या कॅप्शनने चर्चांना उधाण

आपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून अजय कोठीयाल यांचे नाव जाहीर केलं आहे. त्यांनी प्रलयानंतर केदारनाथची पुनर्बांधणी केली. याबद्दल त्यांची प्रशंसा करताना केजरीवाल म्हणाले की, आमचे नेते कोठीयाल यांनी केदारनाथ पुन्हा उभारले. आता आम्ही उत्तराखंडची पुनर्बांधणी करू.

Web Title: Rupees 1k Per Month For Women Above 18 Years If Aap Gets Elected In Uttarakhand Arvind Kejriwal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..