रशियाच्या 'स्पुटनिक V' लशीची किंमत जाहीर

रशियाच्या 'स्पुटनिक V' (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
sputnik v
sputnik vfile photo
Summary

रशियाच्या 'स्पुटनिक V' (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नवी दिल्ली- रशियाच्या 'स्पुटनिक V' (Sputnik V) लशीची किंमत भारतात 995.40 रुपये असणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'स्पुटनिक V' लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आले आहे. शिवाय भारताने मंजुरी दिलेली स्पुटनिक V ही तिसरी लस ठरली आहे. विशेष म्हणजे या लशीचा वापर सुरु झाला असून पहिला डोस हैद्राबादमध्ये देण्यात आला आहे. लशींच्या किंमतीवर 5 टक्के जीएसटी लागू असेल. लशींची निर्मिती भारतात होऊ लागल्यास याची किंमत आणखी कमी होईल, असं डॉ. रेड्डीजने सांगितलंय. (russia Sputnik V To Cost 995 rs Per Shot First Dose Administered)

लस पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल. स्पुटनिक लशीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल झाली होती. 13 एप्रिलला या लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली होती. पुढील खेप काही दिवसांत दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज देशात स्पुटनिक लशीचे उत्पादन करणार आहे. त्यानंतर या लशीची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

sputnik v
'स्पुटनिक लाइट' ८० टक्के कार्यक्षम; नव्या स्ट्रेन्सवरही प्रभावी - रशिया

भारतात सध्या देण्यात येणाऱ्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड पेक्षा रशियाची स्पुटनिक लस अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. जगातील फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लशीनंतर रशियाची स्पुटनिक सर्वाधिक प्रभावी असल्याचं रशियन वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. आतापर्यंत जगभरातील 20 लाख लोकांना स्पुटनिकचा डोस देण्यात आला आहे. स्पुटनिक द्रव आणि पावडर अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. द्रव स्परुपात लशीला -18 डिग्री तापमानात ठेवावे लागते. पावडर स्वरुपात याला 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवावं लागतं.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्णांची संख्य़ा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे देशात लशींचा तुटवडा जाणवत आहे. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या वापराला मंजुरी आहे. पण, देशाची लोकसंख्या पाहता या लशी कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जगभरातील लस निर्मिती कंपन्यांना भारतात येण्याची ऑफर दिली आहे. रशियाने ही ऑफर स्वीकारली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com