
कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण हे छोटंसं, पवित्र शहर. एकीकडे महाबळेश्वर मंदिर आणि नयनरम्य समुद्रकिनारे यामुळे पर्यटकांचे आकर्षण, तर दुसरीकडे सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी वेढलेलं निसर्गरम्य सौंदर्य. पण याच गोकर्णच्या रामतीर्थ पहाडांमधील एका दुर्गम गुहेत घडलेली एक थरारक घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक रशियन महिला, नीना कुटिना, आणि तिच्या दोन मुलींसह गेली आठ वर्षे जंगलात लपून राहत होती. सापांशी मैत्री आणि गुहेतलं रहस्यमय जीवन यामुळे ही कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही!