
गोकर्ण जंगलातील डोंगरावरील एका गुहेत राहणाऱ्या रशियन महिला निना कुटिना आणि तिच्या दोन मुलींची कहाणी सध्या चर्चेत आहे. 11 जुलै रोजी पोलिस गस्ती दरम्यान ही तिघी गुहेत आढळल्या. निनाचा पती, इस्रायलचा रहिवासी ड्रोर गोल्डस्टाईन याने प्रथमच याबाबत खुलासा केला आहे. त्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, निनाने त्याला न कळवता गोवा सोडला आणि तो आपल्या मुलींच्या संपर्कात राहण्यासाठी धडपडत आहे.