
रशियन महिला निना कुटिना गोकर्णच्या जंगलातील गुहेत ८ वर्षे आपल्या दोन मुलींंसह राहिली.
ती गॅस स्टोव्ह आणि लाकडांवर स्वयंपाक करत होती, आणि रोटी-भाजीसारखे साधे पण पौष्टिक अन्न मुलींना द्यायची.
निना शिक्षिका असून ती संगीत, चित्रकला आणि होमस्कूलिंगद्वारे मुलांना शिकवत होती व जगभर प्रवास करते.
कर्नाटकातील गोकर्णजवळील रामतीर्थ डोंगरातील गुहेत राहणारी 40 वर्षीय रशियन महिला निना कुटिना आणि तिच्या दोन मुली, प्रेमा (6) आणि आमा (4), यांची कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 11 जुलै 2025 रोजी पोलिसांनी त्यांना वाचवले, परंतु निनाच्या मते, तिचे जंगलातील जीवन शांत, कलात्मक आणि स्वयंपूर्ण होते. तिच्या या अनोख्या जीवनशैलीने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.