मोदी पुन्हा चर्चेत; जयशंकर यांनी सांगितला 'त्या' मध्यरात्रीचा किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S Jayshankar

मोदी पुन्हा चर्चेत; जयशंकर यांनी सांगितला 'त्या' मध्यरात्रीचा किस्सा

S Jayshankar On Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. यावेळीदेखील मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले असून, यावेळचा किस्सा स्वतःहा विदेश मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले आहे. 'Modi @ 20: Dreams Meet Delivery' या पुस्तकावरील चर्चेदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा: Narayan Rane: आदित्यही तुरुंगात जाणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मोदी बदल घडवून आणतील का? असा प्रश्न विचारला जातो. मात्र, मोदी स्वतः बदलाचे परिणाम आहेत. त्यांच्यासारखी व्यक्ती देशाची पंतप्रधान झाली आहे, यावरून देश किती बदलला आहे, हे लक्षात येते. असे जयशंकर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मोदींशी संबंधित एक संस्मरणीय किस्सा शेअर केला.

ते म्हणाले, ज्यावेळी तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता आणि तेथील भारतीय विद्यार्थ्यांना हाकलून देण्याची मोहीम सुरू होती. त्यावेळी मोदींनी मला मध्यरात्री फोन करत तुम्ही जागे आहात का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर मी हो असे उत्तर दिले. यानंतर पंतप्रधानांनी विचारले की, तुम्ही टीव्ही पाहत आहात का?, तिथे अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे? त्यावर थोड्याच वेळात मदत पोहोचत असल्याचे मी त्यांना सांगितल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Dasara Melava: शिंदे गटाच्या मेळाव्याला मोदी-शाह येणार; चर्चेला उधाण

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी मदत पोहोचेल त्यावेळी मला फोन करण्यासही मोदींनी सांगितले. त्यावर मदत पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन तास लागतीस असे मी सांगितले. त्यावर मोदींनी मोठ्या आवाजात नाही म्हणत मला थेट कॉल करण्यास सांगितले. पंतप्रधानांमधील हा अद्वितीय गुण आहे.

Web Title: S Jaishankar Open Some Memories Of Pm Narendra Modi During Discussion On Book Modi 20 Dreams

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..