
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर अर्ध्या तासात पाकिस्तानला केवळ दहशतवादी तळांवरच कारवाई केली जात आहे असे कळविले, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदीय सल्लागार समितीसमोर स्पष्ट केले. तसेच, पाकिस्तानला ‘डीजीएमओ’मार्फतच माहिती दिली जाते, अन्य कोणत्याही मार्गाने संपर्क झालेला नाही, असेही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले.