
Atique Ahmed : कुटुंबीयांच्या डोळ्यात भीती; अतिकची बहीण म्हणाली, 'भावाचा होऊ शकतो एन्काउंटर'
Atique Ahmed News : अतिक अहमदच्या बहिणीनं भावाच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केलीये. अतिक अहमदच्या बहिणीनं सांगितलं की, 'कालच माझ्या भावानं त्याच्या एन्काउंटरबद्दल सांगितलं होतं. त्याची भीती बरोबर आहे.'
त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. माझ्या भावाची प्रकृती ठीक नाहीये, तरीही त्याला साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणलं जात आहे, असंही तिनं सांगितलं.
आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, सुरक्षेची मागणीही केली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणालाही गुन्हेगार म्हणू शकत नाही, असं अतिकच्या बहिणीनं म्हटलंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतिकला पोलिसांकडून नाश्त्याची ऑफर करण्यात आली, पण त्यानं काहीही घेण्यास नकार दिला. रात्रभर प्रवास करणाऱ्या पोलिसांनी झाशी पोलिस ठाण्यात थोडी विश्रांती आणि नाश्ता केला. इथं ताफ्यातील वाहनांचे चालकही बदलण्यात आले. शिवपुरी आणि झाशी दरम्यान अतिकच्या ताफ्याला गुरांची टक्कर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.