esakal | सचिन पायलट ३५ कोटी प्रकरणी आक्रमक; पाठवली कायदेशीर नोटीस

बोलून बातमी शोधा

Sachin Pilot has served a legal notice to Congress MLA

राजस्थानमधील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेऊन अशोक गेहलोत सरकारवर अस्थिरतेचं संकट निर्माण करणाऱ्या सचिन पायलट यांच्या काँग्रेस आमदार गिरीराज सिंह यांनी ३५ कोटी रुपये देऊ केल्याचा आरोप केला होता. या आरोप प्रकरणी सचिन पायलट हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी गिरीराज सिंह यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सचिन पायलट ३५ कोटी प्रकरणी आक्रमक; पाठवली कायदेशीर नोटीस
sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाही. राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेऊन अशोक गेहलोत सरकारवर अस्थिरतेचं संकट निर्माण करणाऱ्या सचिन पायलट यांच्या काँग्रेस आमदार गिरीराज सिंह यांनी ३५ कोटी रुपये देऊ केल्याचा आरोप केला होता. या आरोप प्रकरणी सचिन पायलट हे आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी गिरीराज सिंह यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गिरीराज सिंह यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजपत प्रवेश करण्यासाठी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. गिरीराज सिंह यांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत खोटे आरोप केल्याप्रकरणी सचिन पायलट यांनी ही नोटीस पाठवली असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंबंधी एएनआयने वृत्त दिलं आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार गिरीराज मलिंगा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की, माझी सचिन पायलट यांच्याशी चर्चा झाली. ते माझ्याशी बोलले आणि किती पैसे हवे आहेत अशी विचारणा केली. त्यांनी मला ३५ कोटींची ऑफर दिली. हे डिसेंबरपासून सुरु असून यात काही नवीन नाही. मला हे शक्य नाही असे मी त्यांना स्पष्ट सांगितलं असल्याचेही गिरीराज सिंह बोलले होते. सचिन पायलट आणि आपलं दोन ते तीन वेळा बोलणं झालं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं होतं. यानंतर सचिन पायलट आक्रमक झाले असून त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.