राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot
राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान?

राजस्थान: गेहलोत मंत्रिमंडळात पायलट समर्थकांना मिळणार स्थान?

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंजाबनंतर आता राजस्शान काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याआधी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात 5 पायलट समर्थकांना स्थान मिळू शकते अशी शक्यता आहे. आज राजस्थान सरकारचे नवीन मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. त्यापूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. राजस्थानच्या मंत्रिमंडळाची शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जयपूर येथील निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळात हेमाराम चौधरी, महेंद्रजित सिंग मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, ममता भूपेश, टिकाराम ज्युली, भजन लाल जाटव, गोविंद राम मेघवाल आणि शकुंतला रावत यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. जाहिदा, ब्रिजेंद्र ओला, राजेंद्र गुडा आणि मुरारी लाल मीना यांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडू शकते. तर सध्याच्या या नव्या मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळ एकूण 30 मंत्र्यांचे केले जाऊ शकते.

दरम्यान, यापूर्वी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांतील अंतर्गत वादातून पायलट यांनी आपल्या समर्थकांसह राजीनामा दिला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापाठोपाठ ते भाजपमध्ये जातील अशी शक्यताही वर्तविली जात होती. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांची समजूत काढली होत.

loading image
go to top