Jaggi Vasudev Brain Surgery Update : जग्गी वासुदेव यांची इमर्जन्सी ब्रेन सर्जरीनंतर कशी आहे तब्येत? व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Jaggi Vasudev Brain Surgery Update : ६६ वर्षीय जग्गी वासुदेव हे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत आणि त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी 'माती वाचवा' आणि 'रॅली फॉर रिव्हर्स' या मोहिमा सुरू केल्या आहेत.
Jaggi Vasudev Brain Surgery Update
Jaggi Vasudev Brain Surgery Update Esakal

Jaggi Vasudev Brain Surgery Update : सुप्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूतील रक्तस्रावामुळे रविवारी 17 मार्च रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सद्गुरूंनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करून आरोग्यविषयक अपडेट दिले आहेत.

व्हिडिओमध्ये ते वर्तमानपत्र वाचताना दिसत आहे. 19 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सद्गुरु वृत्तपत्र वाचताना आणि हॉस्पिटलच्या खोलीत मंद संगीत ऐकताना दिसत आहेत.

बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये सद्गुरुंची कन्या राधे जग्गी यांनी ते बरे होत असल्याची माहिती दिली. इशा फाऊंडेशनने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'सद्गुरु बरे होत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.'

६६ वर्षीय सद्गुरुंनी पर्यावरण रक्षणासाठी 'माती वाचवा' आणि 'रॅली फॉर रिव्हर्स' या मोहिमा सुरू केल्या आहेत. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलने बुधवारी एका निवेदनात म्हटले होते की, 17 मार्च रोजी मेंदूतील रक्तस्त्राव रोखण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Jaggi Vasudev Brain Surgery Update
Jaggi Vasudev Brain Surgery : जग्गी वासुदेव यांच्यावर झाली इमर्जन्सी ब्रेन सर्जरी; पाहा शस्त्रक्रियेनंतरचा Video

शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अध्यात्मिक गुरूशी बोलून त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पीएम मोदींनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, "सद्गुरु जग्गी वासुदेवजी यांच्याशी बोललो आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या".

सद्गुरुंनी लगेचच पंतप्रधानांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले की, “प्रिय पंतप्रधान, तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्हाला राष्ट्रासाठी अनेक कामे करायची आहेत, मी बरे होण्याच्या मार्गावर आहे. धन्यवाद".

Jaggi Vasudev Brain Surgery Update
ISRO PSLV Module 3 : आणखी एक मैलाचा दगड! इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com