West Bengal : पालघर घटनेची पश्चिम बंगालमध्ये पुनरावृत्ती? मुलं चोरणारे समजून तीन साधूंना बेदम मारहाण, भाजपचा आरोप

भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या एक्स हँडलवरुन या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे.
West Bengal Mob Lynching
West Bengal Mob LynchingeSakal
Updated on

मुलं चोरणारे असण्याच्या संशयावरुन तीन साधूंना लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बंगालमध्ये समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील ही घटना असल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या एक्स हँडलवरुन या प्रकाराचा कथित व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी बंगालमधील ममता सरकारवर टीकाही केली आहे.

"पश्चिम बंगालच्या पुरुलियामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीसाठी गंगासागरला जाणाऱ्या साधूंना पालघरमध्ये झालेल्या घटनेप्रमाणेच मारहाण करण्यात आली. साधूंना मारहाण करणारे हे गुंड सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे. ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये शहाजहान शेख सारख्या दहशतवाद्याला सुरक्षा मिळते, आणि साधूंना मारहाण केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणं हाच गुन्हा आहे!" असं मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अमित मालवीय हे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. सकाळ माध्यम समूह या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

पालघर प्रकरण

2020 साली पालघर जिल्ह्यामध्ये मुलं चोरणारे समजून साधूंना बेदम मारहाण केली होती. यामध्ये दोन साधूंचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 100 हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.