
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांना पाठिंबा; म्हणाल्या, तर मी पण...
भोपाळ : प्रेषित पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना आता भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. साध्वी प्रज्ञासिंह या देखील वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असतात. आता या निमित्त त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Sadhvi Pragya Singh Thakur support to Nupur Sharma)
हेही वाचा: राष्ट्रवादीला फटका... मलिकांची सुधारित याचिकाही फेटाळली!
साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या, खरं बोलणं जर विद्रोह असेल तर आम्ही देखील विद्रोही आहोत. जय 'सनातन, जय हिंदुत्व' अशी घोषाबाजीही त्यांनी यावेळी केली. या ट्विटनंतर खासदार म्हणाल्या, मी खरं बोलण्यासाठी बदनाम आहे. ज्ञानवापी मशीदीचं नाव न घेता त्यांनी म्हटलं की, हे सत्य आहे की, तिथं शिवमंदिर होतं आणि कायम राहिल. हा आमच्या हिंदू देवता आणि सनातन धर्मावर आघात आहे. त्यामुळं आम्ही इतरांचं खरं रुप उघड करु तुम्ही आमचं खरं रुप दाखवून द्या आम्हाला ते स्विकारार्ह आहे. पण आम्ही तुमचं खरं रुप दाखवतोय तर तुम्हाला त्रास होतोय. याचा अर्थ असा आहे की, इतिहास कुठे ना कुठे विकृत झालाय.
हेही वाचा: शिवसेनेला 'किंगमेकर' होण्याची संधी, सेना रुजणार की नुसतीच वाजणार?
खासदार साध्वी पुढे म्हणाल्या, जर कोणीही काही म्हटलं तर त्याला धमकी दिली जाते, असं कायम निधर्मी लोकांनी केलं आहे. आमच्या देवी-देवतांवर सिनेमा काढतात. याद्वारे त्यांच्यावर चिखलफेक करतात. त्याचा संपूर्ण इतिहास कम्युनिस्ट आहे. हे निधर्मी लोक आपली मानसिकता दाखवून देतात. हा भारत असून तो हिंदुचा देश आहे. इथं सनातन धर्म जिवंत राहिल आणि जिवंत ठेवावं लागेल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे निधर्मी लोक आपली मानसिकता प्रत्येक ठिकाणी स्थापन करु पाहत आहेत. सनातन धर्म हा मानवीय धर्म आहे.
हेही वाचा: व्हील चेअरवरून विधानभवनात; आजारी असलेल्या 'दोन्ही' आमदारांचे मतदान पूर्ण
भाजपच्या निलंबित खासदार निपूर शर्मा यांनी न्यूज चॅनेलवरील एका डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. यावरुन जगातील मुस्लिम देशांनी आक्षेप घेत भारताला सुनावण्याचे प्रकार घडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा वाद पोहोचल्यानं भाजपनं यावर स्पष्टीकरण देत आम्ही कुठल्याही धर्माचा आणि धर्म संस्थापकांचा सन्मान करतो. यानंतर त्यांनी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्लीच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन जिंदाल यांना पक्षातून तातडीनं निलंबित केलं.
Web Title: Sadhvi Pragya Singh Thakur Support To Nupur Sharma
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..