"मुस्लिमांचा अल्लाह बहिरा आहे, त्यामुळं..."; साध्वींचं वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadhvi Ritambhara

'संपूर्ण समाजाच्या शांततेसाठी संविधानानं उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे.'

"मुस्लिमांचा अल्लाह बहिरा आहे, त्यामुळं..."; साध्वींचं वादग्रस्त विधान

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मंदसौर दौऱ्यावर आलेल्या साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर (Mosque loudspeaker) हटवण्याबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. मुस्लिमांचा देव (अल्लाह) बहिरा आहे, त्यामुळं मोठ्यानं ओरडावं लागतं, असं त्यांनी म्हटलंय. मंदसौरमधील अष्टमुखी भगवान पशुपतीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना साध्वी ऋतंभरा यांनी हे वक्तव्य केलंय.

आज (शुक्रवार) साध्वी ऋतंभरा ह्या मंदसौरमध्ये पोहोचून भगवान पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं. इथं त्या मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलताना म्हणाल्या, निसर्ग सहधर्मवादी असला पाहिजे. निसर्गावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. याचं कारण लाऊडस्पीकरचा वाढलेला आवाज आहे, ज्यानं प्रदूषण होत आहे. त्यामुळं संपूर्ण समाजाच्या शांततेसाठी संविधानानं (Indian Constitution) उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे.

मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या प्रश्नावर साध्वी पुढं म्हणाल्या, 'तुमची पूजा, भक्ती, पठण वैयक्तिक आहे. मुस्लिमांचा (Muslim) देव (अल्लाह) बहिरा आहे, असं आम्ही ऐकलं होतं. म्हणूनच, त्यांना इतक्या मोठ्यानं ओरडून सांगावं लागतं. प्रार्थनेसाठी शब्दांची गरज नसते, तर आंतरिक भावना महत्वाची असते, असं त्या म्हणाल्या. साध्वींच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मध्य प्रदेश अध्यक्ष सय्यद अनस अली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'साध्वी ऋतंभरा यांच्याकडं योग्य माहिती नाहीय. अज़ान देवाला हाक मारण्यासाठी नाही, तर त्याच्या सेवकांना बोलावण्यासाठी आहे.'

टॅग्स :Madhya PradeshMosque