Saffron Farming : जम्मू-काश्मीरमध्ये केशर लागवडीतील घट थांबविण्यात यश आले असून आता विस्तारीकरणासाठी नवी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या नियोजनानुसार हा विस्तार हाती घेतला जाणार आहे.
जम्मू : केशर म्हटले की जम्मू आणि काश्मीरची आठवण होते. येथील केशर जगप्रसिद्ध आहे. केशर लागवडीत होणारी घट थांबविण्यात यश आल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर सरकारने दिली.