
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पुन्हा एकदा रोटी बनवताना त्यावर थुंकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. अशी घटना सहारनपूरमध्ये पहिल्यांदाच घडलेली नाही, यापूर्वीही रोटीवर थुंकल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बेहट पोलीस स्टेशन (Behat Police Station) हद्दीतील एका ढाब्याचा (Dhaba) असल्याचे सांगितले जात आहे, जिथे एक तरुण रोटी बनवण्याचे काम करतो.