रामजन्मभूमी पूजनासाठी संत महात्मे होणार सहभागी; अशी असेल तयारी

पी. बी. सिंह
Friday, 31 July 2020

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्यासाठी जय्यत तयार सुरू असून यात आयोजनात बदल करण्यात आला आहे. भूमिपूजनाला उपस्थित राहणारे संत- महात्मे आणि अन्य प्रमुख व्यक्तींसाठी बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी दोन मांडव उभारण्यात येणार आहेत. यामुळे तेथे आता सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केले जाणारे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्यासाठी जय्यत तयार सुरू असून यात आयोजनात बदल करण्यात आला आहे. भूमिपूजनाला उपस्थित राहणारे संत- महात्मे आणि अन्य प्रमुख व्यक्तींसाठी बैठकीसाठी कार्यक्रमस्थळी दोन मांडव उभारण्यात येणार आहेत. यामुळे तेथे आता सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित केले जाणारे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्यक्रमस्थळी ६०० पाहुण्यांच्या बैठकीची व्यवस्था असेल. सुरक्षित अंतराचा नियम पाळत मांडवात खुर्च्या ठेवण्यात येणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमासाठी आधी केवळ २०० लोकांची व्यवस्था होती. विविध आखाडे, मठ व मंदिरांच्या संत-महात्म्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येणार नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशा प्रकारे उपेक्षा केली जात असल्याची तक्रार त्यांनी केल्यानेच नियोजनात बदल करण्यात आला आहे.

भूमिपूजनासाठी...

  • छोटे व्यासपीठ उभारणार.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आदींची व्यासपीठावर उपस्थिती.
  • मोदी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी येणार. 
  • आगमनानंतर प्रथम अस्थायी मंदिरात दर्शन करणार. हनुमान गढीला भेट देऊन नंतर आयोजन स्थळी पोचतील.
  • घाटांवर व मंदिरात दीपोत्सव साजरा करणार.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saints and Mahatmas will also participate in ayodhya BhumiPujan